Police Patil Recruitment  Pudhari
बीड

Police Patil Recruitment | केज तालुक्यात पोलिस पाटील पदे भरणार; जाणून घ्या कोणत्या गावात कोणते आरक्षण

Beed News | अंबाजोगाई येथे केज तालुक्यातील पोलिस पाटील पदासाठी आरक्षण सोडत

पुढारी वृत्तसेवा

Kej taluka Police Patil posts recruitment

गौतम बचुटे

केज : महसूल आणि पोलिस प्रशासनाचा दुवा म्हणून ग्राम ग्राम स्तरावर अत्यंत महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाणारे पोलिस पाटील पदासाठी केज तालुक्यातील आरक्षण सोडत काढण्यात आली. केज तालुक्यातील पोलिस पाटील पदासाठी आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांच्या उपस्थितीत आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, काढण्यात आली.

अंबाजोगाई उपविभागातील पोलीस पाटील पदाची २०२ बिंदु सरळसेवा भरतीची बिंदुनामावली प्रमाणित करण्यात आलेली आहे. त्यानुसार रिक्त पदाच्या आरक्षित गावे व ३० टक्के महिला आरक्षित रिक्त पदांच्या गावांसह तपशील पुढील प्रमाणे आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी (मराठा समाजास) १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

केज तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाचा प्रवर्ग निहाय आरक्षणाचा तपशिल खालील प्रमाणे

अनुसूचित जातीसाठी आरक्षण :-

१.सौदाना, २. इस्थळ, ३. साळेगाव

अनुसूचित जाती महिला आरक्षित :-

१. लव्हुरी, २. मस्साजोग, ३. मोटेगाव, ४. लाखा,

अनुसूचित जमाती :-

१.बोबडेवाडी, २. रामेश्वरवाडी, ३. हनुमंत पिंप्री, ५. राजेगाव ७. सुर्डी, ८. धोत्रा

अनुसूचित जमाती महिला राखीव :- १. ढाकेफळ, २. बावची, ३. पैठण

भटक्या जमाती (ब) :- १. मुलेगाव, २ सुकळी

भटक्या जमाती (क) :- १. माळेवाडी, २. औरंगपूर

भटक्या जमाती (इ):- १. केकणवाडी,.२. नरेवाडी, ३. दरडवाडी

भटक्या जमाती महिला (इ) :- १. तुकुचीवाडी

विशेष मागास प्रवर्ग महिला :- १. भालगाव

इतर मागसवर्ग :-

१. कानडी माळी, २. कोठी, ३. शेलगाव गांजी, ४. चिंचोलीमाळी, ५. साबला, ६. सोनेसांगवी, ७. गौरवाडी, ८. काळेगाव घाट, ९. जानेगाव, १०. विडा, ११. येवता, १२. पाथरा, १३. कौडगाव, १४. तांबवा

इतर मागासवर्ग महिला :-

१. जाधव जवळा, २. वाघेबाभुळगाव, ३. नायगाव, ४. उमरी

सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) :-

१. गप्पेवाडी, २. सारुळ, ३. आरणगाव, ४. दिपेवडगाव, ५. भाटूंबा, ६. शिरपुरा ७. सातेफळ, ८. हनुमंतवाडी

सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) महिला :- १. काशिदवाडी, २. एकुरका, ३. मुंडेवाडी ४. हादगाव, ५. दैठणा

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक :- १.जवळबन, २. सारणी (आनंदगाव), ३. गदळेवाडी, ४. जोला, ५. तरनळी, ६. देवगाव, ७. कासारी, ८. डोका, ९. नागझरी

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला :- १. होळ, २. कानडीबदन, ३. सारुकवाडी, ४. कोरेगाव

अराखीव :-

१. उंदरी, २. पिराचीवाडी, ३. पिट्टीघाट, ४. आवसगाव, ५. सासू, ६. लाडेवडगाव, ७. आंधळेवाडी, ८. ढाकणवाडी, ९. वाकडी, १०. केळगाव, ११. कोल्हेवाडी, १२. धर्माळा, १३. शिरुरघाट, १४. गोटेगाव, १५. बेलगाव, १६. बोरगाव (बु.), १७. कळमअंबा, १८. बाणेगाव, १९. पिसेगाव, २०. कोरडेवाडी २१. पळसखेडा, २२. भोपला, २३. सारणी (सांगवी), २४. कापरेवाडी, २५. लाडेगाव, २६. माळेवाडी, २७. सांगवी (सारणी)

अराखीव महिला :-

१. केकतसारणी, २. घाटेवाडी, ३. टाकळी, ४. दहिफळ (वडमाऊली), ५. जिवाचीवाडी, ६. नाव्होली, ७. आनेगाव, ८. सातेफळ, ९. पिंपळगाव, १०. सौंदणा, ११. कुंबेफळ, १२. सावळेश्वर (पैठण)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT