Sand Mafia : वाळूमाफियांकडून पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की pudhari photo
बीड

Sand Mafia : वाळूमाफियांकडून पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

बीड तालुक्यातील सिंदफना नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Police officer assaulted by sand mafia

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा बीड तालुक्यातील सिंदफना नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना खुडूस (ता. बीड) येथे घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी महिलांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल हे आपल्या पथकासह ३१ मार्च रोजी रात्री खुडूस येथे गेले असता सिंदफना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी हायवा चालकाकडे मालकाची चौकशी केली असता माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध प्राथमिक कारवाई केली.

दरम्यान, वाळूने भरलेला हायवा आणि जेसीबीच्या मदतीने सुरू असलेल्या उपशावर कारवाई करताना पोलिसांनी जेसीबी ताब्यात घेण्यासाठी पाठलाग केला. त्यावेळी जेसीबी मालकाने गावातील लोकांना बोलावून घेतले. जमावाने पोलिसांवर धावून जात अरेरावी केली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

या घटनेप्रकरणी पोउपनि अर्जुन गोलवाल यांच्या फिर्यादीवरून किशोर लक्ष्मण डोईफोडे (वय २२, रा. ईट, ता. बीड), श्रीमंत खांडे, सिद्धेश्वर हाटवटे, संभाजी सिद्धेश्वर हाटवटे, ओम उर्फ आप्पासाहेब तसेच दोन महिलांसह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT