Beed News : पोलिस गायब; माजलगावच्या तहसीलदारांचा कडक पवित्रा File Photo
बीड

Beed News : पोलिस गायब; माजलगावच्या तहसीलदारांचा कडक पवित्रा

पूर पाहण्यासाठी आणि मोबाईलवर सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी शेकडो नागरिक नदीकाठावर जमले.

पुढारी वृत्तसेवा

Police missing; Majalgaon Tehsildar's strict stance

सुभाष नाकलगावकर

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : सिंदफना नदीला आलेला महापूर -धरणाचे ११ दरवाजे उघडले गेल्या आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण भरले असून, शुक्रवारी धरणाचे तब्बल ११ दरवाजे उघडून लाखो क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सिंधफणा नदीपात्रात महापूर आला. जोरदार प्रवाहामुळे जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला.

पूर पाहण्यासाठी आणि मोबाईलवर सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी शेकडो नागरिक नदीकाठावर जमले. पाण्याचा वेग लक्षात न घेता काही तरुण नदीपात्राकडे सरसावत होते. या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

धोकादायक परिस्थितीत नागरिकांना रोखण्यासाठी घटनास्थळी पोलीस कर्मचारी असणे आवश्यक होते. मात्र, एकही पोलीस अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता. फक्त होमगार्ड प्रयत्न करत होते, परंतु जमावाने त्यांचा सल्ला ऐकला नाही. ही गंभीर परिस्थिती पाहून तहसीलदार संतोष रूईकर यांनी स्वतः पुढाकार घेतला.

गाडीतून उतरून त्यांनी हातात काठी घेतली आणि पाण्याकडे धावणाऱ्या जमावाला चांगलाच चोप देत पांगवले. अवघ्या काही मिनिटांतच शेकडो लोक नदीकाठावरून हटले आणि संभाव्य अपघात टळला. जमाव पूर्णपणे हटल्यावर काही वेळाने शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जबाबदार अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे तहसीलदार रूईकर यांनी पोलिस यंत्रणेतील निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT