Shivaji Phatak File Photo
बीड

Beed teacher accident: क्लास घेऊन घरी परतताना काळाचा घाला; पिकअपच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

बीड येथून पाडळसिंगी-पाथर्डी मार्गे चकलांबाकडे दुचाकीवरून जात असलेल्या ३० वर्षीय शिक्षकाच्या दुचाकीला पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Beed teacher accident

गेवराई : बीड येथून पाडळसिंगी-पाथर्डी मार्गे चकलांबाकडे दुचाकीवरून जात असलेल्या ३० वर्षीय शिक्षकाच्या दुचाकीला पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास काजळा-तांदळा परिसरात घडली.

शिवाजी फाटक (वय ३०) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रहिवासी असून बीड तसेच चकलांबा येथे विद्यार्थ्यांना शिकवणी घेत होते. या घटनेनंतर बुधवारी चकलांबा गावात बंद पाळण्यात आला. गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी फाटक हे मंगळवारी बीड येथे क्लास घेऊन दुचाकीवरून पाडळसिंगी-पाथर्डी मार्गे चकलांबाकडे निघाले होते. दरम्यान, काजळा-तांदळा परिसरात पाथर्डीकडून येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे चकलांबा गावावर शोककळा पसरली. बुधवारी दुपारी चकलांबा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, शिक्षकाच्या मृत्यूनंतर बुधवारी चकलांबा गावात बंद पाळण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत चकलांबा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT