Phaltan police's role is suspicious; SIT should investigate
बीड, पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांनी फलटण पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ना उपस्थित केले आहे. ज्या पोलिसांकडून डॉक्टर तरुणीवर दबाव येत होता, त्यांच्या परिचयाच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे या सर्व प्रकरणाचा तपास आहे. यामुळे काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते असा आरोप कुटुंबीयांनी केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फ त करावी अशी मागणी कुटुंबीयांनी बीडमध्ये सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केली.
बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही घटना आम्हा कुटूंचीयांना माहिती झाल्यानंतर २३ रोजी संध्याकाळी बीड मधून रात्री ९ वाजता निघालो, २४ रोजी पहाटे ३ वाजता त्या ठिकाणी पोहचल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला येण्यास उशीर झाला असे सांगितले. नातेवाईक त्या ठिकाणी पोहचण्याच्या आधीच डॉक्टर तरुणीचा मृतदेह हॉटेलमधून रुग्णालयात नेण्यात आला होता, त्याची साधी माहिती देखील देण्यात आली नाही.
डॉक्टर तरुणी कार्यरत असतांना तीला पोस्टमार्टम करण्यासाठी रात्री अपरात्री बोलावले जात होते, परंतु जेव्हा तिच्याच मृतदेहाचे पोस्टमार्टम करायचे होते, त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तेथील वैद्यकीय अधिक्षकांना संपर्क साधूनही ते पहाटे पोलिसांनी गाडी पाठवल्यानंतर आले. हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर असतांना यंत्रणा मात्र काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाची चौकशी चौकशी करावी यासाठी कुटुंबीयांकडून मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्या पूर्ण झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी ही स्वतंत्र एसआयटी समिती नियुक्त करून करण्यात यावी. तसेच ही समिती मा. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असावी, महिला आयपीएस अधिकारी या समितीचे सदस्य असावेत. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात बीड येथे चालवण्यात यावे, गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, वारंवार तक्रार करुनही तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तत्कालीन डीवायएसपी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, डॉक्टरने यापूर्वी केलेल्या सर्व तक्रारींचा तपास करण्यात यावा.
२१ ते २४ ऑक्टोबरपर्यंत संपदाचे गुगल मॅप मधील लोकेशन डिटेल्स, टाईप लाईन आणि टॉवर लोकेशन कुटुंबीयांना उपलब्ध करुन द्यावे. उपजिल्हा रुग्णालयात मयत डॉक्टर तरुणी व इतर डॉक्टर्स यांचे ड्युटी रजिस्टर उपलब्ध करुन द्यावे.