Parli Vaijnath Post Office Cash Theft AI Photo
बीड

Parli Cash Theft | पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या वृद्धेची ५० हजार रोकडची पिशवी हिसकावली

धक्का देऊन गोंधळाचा फायदा घेत रोकड चोरली; परळी वैजनाथमध्ये अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Parli Vaijnath Post Office Cash Theft

परळी वैजनाथ : पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची पिशवी धक्का देऊन हिसकावून घेत त्यातील ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना परळी वैजनाथ येथे घडली. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक कॉलनी, परळी वैजनाथ येथील पद्मिनी संदीपान सूर्यवंशी (वय ७०) या १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोकड होती.

दरम्यान, पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या मागून आलेल्या अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी महिलेने सूर्यवंशी यांना धक्का दिला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वृद्ध महिलेचा गोंधळ उडाला. याच संधीचा फायदा घेत संशयित महिलेने त्यांच्या पिशवीतील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर पद्मिनी सूर्यवंशी यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु.र.नं. १८९/२०२६, कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास फौजदार पुजरवाड करीत आहेत. पोस्ट ऑफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT