Parli News : संघर्षात सतीशभाऊ माझ्या तर मी भाऊंसोबत उभा राहिलो आ.धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन file photo
बीड

Parli News : संघर्षात सतीशभाऊ माझ्या तर मी भाऊंसोबत उभा राहिलो आ.धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज परळी येथील अक्षता मंगल कार्यालयात महायुतीचा पदवीधर मेळावा आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढारी वृत्तसेवा

Parli mla Dhananjay Munde Satish Chavan Graduate Constituency Election

परळी, पुढारी वृत्तसेवा : आ. सतीश चव्हाण हे २००८ तर मी २०१० साली विधानपरिषदेत पहिल्यांदा गेलो. स्व. अजितदादांच्या नेतृत्वात काम करत असताना प्रत्येक संघर्षाच्या काळात सतीश चव्हाण माझ्या तर त्याच्या संघर्षात मी त्यांच्या पाठीशी कायम उभे राहिलो, असे आगळेवेगळे आमचे नाते असल्याचे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज परळी येथील अक्षता मंगल कार्यालयात महायुतीचा पदवीधर मेळावा आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षदा मंगल कार्यालय, परळी येथे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी पदवीधर मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला पदवीधर मतदारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. धनंजय मुंडे म्हणाले की, सन २०१३ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एका वेगळ्या व भावनिक परिस्थितीत मी विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी माझ्या सोबतीला सतीश भाऊ खंबीरपणे उभे होते, असे म्हणत उमेदवारी अर्ज भरतानाचा तो फोटोच मुंडेंनी भर सभेत स्क्रीनवर दाखवला!

दरम्यान सतीश चव्हाण यांना १८ वर्षांचा तगडा अनुभव असून पदवीधर, शिक्षक यांसह मराठवाड्यातील स्थानिक प्रश्नांची जाण व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक त्यांच्यात आहे, त्यामुळे या निवडणुकीत सतीश चव्हाण यांचा सलग चौथा विजय निश्चित असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादीचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, अजय मुंडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजा पांडे, राष्ट्रवादी परळी तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, अॅड. विष्णुपंत सोळंके, प्रा. मधुकर आघाव, प्रा. विनोद जगतकर, सूर्यभान मुंडे, सय्यद करीम, अय्युब भाई पठाण, जयपाल लाहोटी, अमर देशमुख, प्रा. हंगे, प्रा. बांगड, पिंटू मुंडे, कैलास तांदळे, शंकर कापसे, अनंत इंगळे, डी जी शिंदे, प्रा. आर बी राठोड, आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT