लुटीच्या घटनेतील रिक्षा Pudhari
बीड

Parli Vaijnath Robbery | लेकीच्या गावाकडे निघालेल्या वृद्धेची निर्जनस्थळी लूट; रिक्षाचालक, महिला पसार

अंबाजोगाई मार्गावरील अंबलवाडी घाटात घटना

पुढारी वृत्तसेवा

Parli Vaijnath Elderly Woman Looted

परळी वैजनाथ : तालुक्यातील मिरवट येथून आपल्या मुलीकडे नेकोटवाडीला जाण्यासाठी निघालेल्या एका ६५ वर्षीय आजीबाईची प्रवासी ऑटो चालक व त्याच्या महिला साथीदाराने निर्जनस्थळी नेऊन लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बायनाबाई माणिक पवार (रा. मिरवट, ता. परळी वैजनाथ) या आपल्या मुलीला भेटण्यासाठी परळी येथे आल्या होत्या. बसस्थानकाबाहेरील प्रवासी ऑटो स्टँडवर चौकशी करत असताना एका अज्ञात चालकाने “नैकोटवाडीला सोडतो” असे सांगत त्यांना आपल्या ऑटोत बसवले.

ऑटो चालकाने नेहमीच्या मार्गाऐवजी अंबाजोगाई रस्त्याने वळसा घेत अंबलवाडी घाटाच्या दिशेने वाहन नेले. निर्जन ठिकाणी पोहोचताच चालकाने व ऑटोत आधीपासून बसलेल्या एका महिलेने मिळून पवार यांना धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यात हातातील सुमारे ४० भार चांदीचे दागिने (किंमत अंदाजे ३०,०००) तसेच गळ्यातील सुमारे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ६०,०००) लुटण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्या महिलेला तिथेच सोडून ऑटो घेऊन पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, बसस्थानकाजवळील ऑटो स्टँडवरील दृश्यांमध्ये संशयित ऑटो आणि आरोपींची हालचाल कैद झाल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT