Crime News pudhari photo
बीड

Parali Crime | परळीत गांजाच्या पुड्या विकणाऱ्या एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल: तेरा हजाराचा गांजा हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी शहरातील वाल्मीक नगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत १३ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला असून परळीत गांजाच्या पुड्या विकणाऱ्या एका आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास वाल्मीकी नगर, एकमीनार चौक परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. या कारवाईत गुड्डू उर्फ छोटूमियाँ तांबोळी (वय ३०, रा. वाल्मीकी नगर, एकमीनार चौक, परळी वैजनाथ) याच्या ताब्यातून ८८ ग्रॅम वजनाचा हिरवट- काळपट रंगाचा, गांजासदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेला गांजा २७ छोट्या पुड्यांमध्ये विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला होता. प्रत्येकी ५०० रुपये किंमतीप्रमाणे या अंमली पदार्थाची एकूण किंमत १३ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२६ नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. अनमोल केदार यांनी केली. पुढील तपास सपोनि. गोंड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT