सावरगाव घाट : भगवान भक्‍तिगडावरील मेळाव्‍याला संबोधित करताना मंत्री पंकजा.  pudhari photo
बीड

Pankaja Munde | मला अंतरवालीत प्रेमाचा प्रसार करायचाय : पंकजा मुंडे

भगवान भक्‍तिगडावरील दसरा मेळावा उत्‍साहात

पुढारी वृत्तसेवा

बीड : आज आपल्यावर दुष्काळाचे संकट आहे, या संकटात आपल्याला जात-धर्माच्या भिंती या मनगटाने पाडून टाकायच्या आहेत. मी जालन्यामध्ये अंतरवाली सराटी दत्तक घेतले आहे, मी अंतरवालीचा विकास करणार आहे. माझ्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावाइतकेच प्रेम मी तिथे करणार आहे, मला प्रेमाचा प्रसार करायचा आहे. जातीपातीच्या जोरावर जो नेता मोठा होऊ इच्छितो त्याला भविष्य नाही, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या संत भगवानबाबांच्या जन्मभूमीतील भगवान भक्‍तिगडावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

जाती-पातीच्या राजकारणाला भविष्य नाही

संकटकाळात जाती-पातीच्या भिंती तुटून जात असतात, आता आपल्या सर्वांवर दुष्काळाचे संकट आहे. या काळात आपल्याला जाती-पातीच्या भिंती मोडून काढायच्या आहेत. जो नेता जाती-पातीच्या जीवावर राज्य करू इच्छितो त्याला भविष्य नाही. ‘भीड मे खडा होना मेरा मक्सद नही है, बल्की भीड जीसके लिए खडी होती है वह बनना है’ अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीचे संकेत सावरगाव घाट येथील भगवान भक्‍तिगडावरील दसरा मेळाव्यातून दिले.

मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या संत भगवानबाबांच्या जन्मभूमीतील भगवान भक्‍तिगडावर दसरा मेळावा पार पडला. मेळाव्‍याचे यंदा बारावे वर्ष होते. भगवान भक्‍तिगडावर दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम भगवानबाबा यांचे पूजन व आरती केली. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ.धनंजय मुंडे, आ.मोनिका राजळे, आ.नमिता मुंदडा, माजी खा.प्रीतम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खा.सुजय विखे पाटील, प्रा.लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, यावर्षी बीडसह राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. ऊन देखील वाढले आहे, अशा स्थितीत दसरा मेळाव्याला किती लोक येतील असे विचारले जात होते, पण माझे हे वाघ उन्हातले, डोंगरातले आहेत, यांच्यावर उन्हाचा परिणाम होत नाही. आज असणाऱ्या दुष्काळाच्या संकटात मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य, कष्टकऱ्यांना मदत करणार आहे.

जनावरांना चारा उपलब्ध करून देणार आहे, सीएसआरच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पाणीपुरवठ्याची सोय करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून नारायणगडाचा उल्लेख करत मी नारायणगडाला नमन करते, गहिनीनाथगडाला नमन करते आणि मच्छिंद्रनाथगडाला सुद्धा नमन करते असे त्‍या म्‍हणाल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT