गेवराई; पुढारी वृत्तसेवा : कापूस भरून निघालेल्या टेम्पोखाली सापडून ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले. तालुक्यातील भेडबुद्रुक येथे आज (दि.२२) सकाळी ही घटना घडली. रघुनाथ बापुराव जंगले (वय ६५) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भेडब्रुद्रुक येथील गल्लीतून टेम्पो (क्रं. एम.एच. १४ बी.जे. ३९३) कापूस भरून निघाला होता. गल्लीतील एका कट्ट्यावर चौघेजण बसले होते. यावेळी त्यांच्याजवळून टेम्पो नेत असताना गल्ली अरूंद असल्याने चालकाचा ताबा सुटला. व टेम्पो पलटी झाला. चौघेही या टेम्पोखाली सापडले. या अपघातात रघुनाथ जंगले यांचा मृत्यू झाला. तर सुनिल राजेंद्र जंगले (वय २५), आकाश नवनाथ जंगले (वय ३०), अशोक चंद्रकांत जंगले (वय ३२) हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :