Objections raised regarding the CID investigation into the Vilas Ghule murder case
केज, पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खूनप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असले तरी, मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी तपासाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. दोषारोपपत्राची प्रत तसेच तपासाची संपूर्ण माहिती आपल्याला अद्याप देण्यात आलेली नाही. सर्व कागदपत्रांची माहिती मिळेपर्यंत संबंधित कागदपत्रांवर सही करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
तपास या प्रकरणातील सीआयडीकडून सुरू असताना तपासी अधिकाऱ्याची भूमिका बदलण्याची मागणीही रमेश घुले यांनी केली आहे. तपासातील काही बाबींबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सौरभ सोनवणे यांच्याबाबत तपासात महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचा दावा रमेश घुले यांनी केला आहे. यापूर्वी रमेश घुले यांनी सौरभ सोनवणे यांच्याशी आरोपींचा संपर्क असल्याचा दावा केला होता.
आरोपींनी सौरभ सोनवणे यांना ५७वेळा फोन केल्याचा दावाही त्यांनी केला होता. या कॉल रेकॉर्डचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता अटकेत असलेल्या दहा आरोपींचे मोबाईल तपासणीसाठी पाठवले असून तो अहवाल आल्यानंतरच सौरभ सोनवणे याचा या प्रकरणात सहभाग होता अथवा नाही, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.