केज : केज मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे. चिंचोली माळी येथील 33 केव्ही उपकेंद्रात आज, सोमवार दि. 19 जानेवारी रोजी उच्च क्षमतेचा नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) दाखल झाला आहे. यामुळे या भागातील वीज टंचाईचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चिंचोली माळी आणि परिसरातील सारुकवाडी, डोका, हातगाव, टाकळी व केवड या गावांमध्ये वाढत्या विजेच्या मागणीमुळे जुना रोहित्र वारंवार ओव्हरलोड होत होता. यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत होते.
ही समस्या ओळखून आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून आणि पत्राद्वारे पाठपुरावा करून नवीन उच्च क्षमतेचा रोहित्र मंजूर करून घेतला आहे. या निर्णयांमुळे चिंचोली माळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नमिता अक्षय मुंदडा, अंबाजोगाई चे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव व जेष्ठ नेते सुनिल गलांडे पाटील, बी. जी. गदळे, व्हाइस चेअरमन आबासाहेब केदार, चेअरमन अरुण काळे, दगडु दळवे, राजाभाऊ नखाते, दिलीप गायकवाड,दिपक शिंदे, बालासाहेब मावकर, राजाभाऊ राऊत, रत्नदीप राऊत, सुनील राऊत, हरिभाऊ यादव,अनिल शिंदे, श्रीरंग गालफाडे, मुबारक पठाण, अमोल जाधव, महादेव गिते, सरपंच गोरख भांगे, मेजर हनुमंत वायबसे, उपसरपंच श्रीराम वायबसे, सुरज घुले, टी.पी.घुले, श्रीराम घुले, चेअरमन रघुनाथ बारगजे, विष्णू राख, बाळासाहेब सत्वधर, चेअरमन गणेश सपाटे, रत्नाकर कोल्हे, गोकुळ गायकवाड, विजय सपाटे, प्रकाश सपाटे यांनी आभार मानले आहेत.