NEET Scam : प्रा.पी.व्ही. कुलकर्णी बीडमध्ये उभारतोय पाच मजली इमारत file photo
बीड

NEET Scam : प्रा.पी.व्ही. कुलकर्णी बीडमध्ये उभारतोय पाच मजली इमारत

निट घोटाळ्यातील आरोपी प्रा.पी. व्ही. कुलकर्णी हा बीड शहरातील शाहूनगर भागात टोलेजंग इमारत उभारत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

NEET Scam : Prof. P.V. Kulkarni is constructing a five-story building in Beed

बीड, पुढारी वृत्तसेवा निट घोटाळ्यातील आरोपी प्रा.पी. व्ही. कुलकर्णी हा बीड शहरातील शाहूनगर भागात टोलेजंग इमारत उभारत असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल पाच मजली इमारतीमध्ये तीस सदनिका राहणार असून यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक केली जाणार आहे. नीट घोटाळ्यातीलच हा पैसा असल्याचा आरोप आता केला जात आहे.

देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यातील आरोपी प्रा.पी.व्ही. कुलकर्णी हा बीडचा असल्याची माहिती समोर आली होती. त्याचे बीडमध्ये वडिलोपार्जीत घर असून ते पाडून टोलेजंग इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. ही इमारत तब्बल पाच मजली होणार असून तब्बल तीस सदनिका यामध्ये राहणार आहेत.

यासाठी कोट्यावधींची गुंतवणूक कुलकर्णी याने केली असून ती नेमकी कोणत्या पैशातून केली? निट घोटाळ्यातीलच तर ही रक्कम नाही ना? अशी चर्चा आता होत आहे, या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी आता केली जात आहे. बांधकाम सुरुच ठेवण्यात आलेले आहे. या सर्व जोर धरु लागली आहे.

बीड शहरातील शाहूनगर भागात या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करतांना नगर परिषदेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. रस्त्यापासून काही अंतर ठेवून बांधकाम करणे गरजेचे असतांना रस्त्यालगत बांधकाम केले जात आहे.

याबरोबरच या बांधकामाच्या बाजूलाच महालक्ष्मी देवीचे मंदिर असून या मंदिराला अगदी लगतच बांधकाम केले जात आहे. यामुळे मंदिराचे पावित्र्य देखील धोक्यात येत असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिले होते, परंतु त्यानंतरही हे तक्रारींची दखल नगरपरिषदेने घ्यावी अशी मागणी जोर धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT