NEET Re-Exam Controversy 
बीड

NEET Re-Exam Controversy: NEET परीक्षेचा मोठा गोंधळ: उत्तरपत्रिकेत ५२२ गुण, पण निकालात मिळाले केवळ ९५!

बीडमधील विद्यार्थ्याचा NEET परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर आक्षेप; चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बीड : NEET परिक्षा दिलेल्या बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याला त्याने सोडवलेल्या उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण मिळाले आहेत. तर प्रत्यक्षात त्याला केवळ 95 गुण मिळाल्याचे निकालातून समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे गवते कुटूंबाला धक्का बसला असून आमची ही शंका एनटीए (NTA)ने दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचा ई मेल देखील त्यांनी पाठवला असला, तरी अद्याप त्याला उत्तर आलेले नाही.

बीड येथील सोहम नितीन गवते याने यावर्षी निटची (NEET 2026) परिक्षा दिली होती. गतवर्षी आजारपणामुळे त्याला परिक्षा देता आली नव्हती, त्यामुळे वर्षभर आणखी अभ्यास करुन त्याने NEETची पहिली परिक्षा दिली. ती रद्द झाल्यानंतर रि निट (Re-NEET) देखील दिली. या परिक्षेत त्याने सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचे ओएमआर शिट आणि एनटीए ने जाहीर केलेली ॲन्सर की (Answer key) त्याने जुळवून पाहिली होती, त्यानुसार त्याला 522 गुण मिळताना दिसतात. त्यामुळे आता आपले वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल अशी खात्री सोहमला होती आणि त्याचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे गवते कुटूंबही आनंदात होते, परंतु निकालात मात्र सोहला अवघे 95 गुण मिळाल्याचे समोर आल्याने या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच तास सोहम कोणाला बोलतही नव्हता. यानंतर नातेवाईकांनी समजूत घातल्यानंतर त्याने मनातील भावना व्यक्त करत याबाबत आपण तक्रार करु अशी भूमिका घेतली. त्यानुसार गवते यांनी एनटीएला ई मेल केला असून त्याला उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही. आता या सर्व प्रकाराची दखल घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी गवते कुटूंबाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT