Beed News : नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आ. धस शेतकऱ्यांच्या बांधावर File Photo
बीड

Beed News : नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आ. धस शेतकऱ्यांच्या बांधावर

आष्टी : नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे प्रशासनाला आदेश

पुढारी वृत्तसेवा

MLA Dhas orders administration to immediately conduct damage assessment

आष्टी, पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात मान्सून दाखल होत असताना दि. ११ रोजी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार सुरेश धस शेतकन्यांच्या बांधावर प्रशासनाला समवेत घेऊन पोहोचले आणि प्रशासनाला सूचना देऊन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.

दि.११ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामु‌ळे शेतकऱ्यांच्या फळबागांची फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक गावातील नागरिकांचे घरांची पडझड झाली असून आणि काही शेतकऱ्यांचे कुकुटपालन शेड, गोठे, आणि जनावरांची जीवित हानी झाली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरीआष्टी, बेलगाव, मुर्शदपूर, किन्ही, बावी, कापशो यासह पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, डागाची वाडी, ठंडेवाडी, कोतन, पांढरवाडी, गांधणवाडी, साबळेवाडी, इतर गावांमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांच कोसळून तारा तुटल्या आहेत. त्यामुळे सध्या विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या गावांना भेटीत देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार सुरेश धस यांनी दिलासा दिला आहे.

शेतकऱ्यांनी देखील आमदार सुरेश धस हे बांधावर आलेल्या आधार मिळयाच्या भावना व्यक्त केले आहेत. तर सकाळीच महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता डोंगरे, कनिष्ठ अभियंता, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, गट विकास अधिकारी ग्रामसेवक आणि गावातील प्रमुख कार्यकर्ते यांची तातडीने बैठक घेतली.

यामध्ये काल झालेल्या पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक शेतकरी आणि नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानी बाबतचे फोटो काढून प्रशासनाशी संपर्क साधावा शासनाकडून नुकसान भरपाई साठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले.

या पाहणी दरम्यान माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, माजी जि. प. माऊली जरांगे, भाऊसाहेब भवर, सरपंच अशोक मुळे, इंद्रजीत गर्ने, अश्रूबा गोल्हार, कारभारी गर्जे, बाबू गर्जे, अशोक जेथे, महेश खेगरे, दादा बेदरे, पाचपुते मुकादम, गाडे सरपंच, पिनू पोकळे, अमोल पोकळे, बाळासाहेब सकुंडे, भाऊसाहेब ससे, तहसीलदार निलावड साहेब, कृषी अधिकारी पवार साहेब, राख साहेब, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यासह महेश खेगरे, दादा वेदरे, पाचपुते मुकादम, गाडे यांच्यासह संबंधित कृषि विभाग, महसूल विभाग व बांधकाम विभाग उपस्थित होते.

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आंबा, उन्हाळी कांदा, कुकुट पालनाचे शेड, विजेचे खांब कोसळून तारा तुटल्या आहेत वादळाचा वेग मोठा असल्यामुळे जुने मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत प्रशासनाकडून नुकसानीबाबत पंचनामे सुरू झाले आहेत तरीही कोणी बंचित राहू नये म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानी बाबतचे फोटो काढून प्रशासनाकडे देण्यात यावेत शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
सुरेश धस, आमदार, आष्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT