Bachchu Kadu : माजी मंत्री कडू यांना पाठिंब्यासाठी रास्ता रोको

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून बेमुदत अन्नत्याग आंदोलन
Bachchu Kadu
Bachchu Kadu : माजी मंत्री कडू यांना पाठिंब्यासाठी रास्ता रोकोFile Photo
Published on
Updated on

Rasta Roko for support to former minister Bachchu Kadu

परंडा, पुढारी वृत्तसेवा : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे व दिव्यांगांना प्रति महिना ६ हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे, या मागण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत, परंतु सरकार त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा म्हणून प्रहार संघटनेच्या वतीने रॅली काढत रस्ता रोको आंदोलन करण्या आले.

Bachchu Kadu
Beed News : उमरगा तालुक्यात वर्षभरात रस्ते अपघातात ६७ जणांचा मृत्यू

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे सहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली असून परंडा येथे बार्शी रोडवर आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या अंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटना, दिव्यांग संघटना यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला.

यावेळी भरत नन्नवरे हरी सरगर, रेवण जानकर, बाळू काळे गोकुळ गवळी अण्णा कोचळे सोमनाथ गायकवाड धनाजी गायकवाड संदीप गायकवाड हंबीरराव मोरे संजय लटके, अभिमान काळे दिलीप काळे मेघराज नरोटे बाळू शिंदे करंडे रघुनाथ अंकुश आहेर धनंजय गोपने, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी ठवरे, दिव्यांग संघटनचे तानाजी घोडके दिव्यांग संघटनचे तानाजी सांगडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bachchu Kadu
Manoj Jarange Patil | बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा : मनोज जरांगे पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news