बीड

Beed News | अर्धा जून महिना संपला तरी पावसाची हुलकावणी, बळीराजाचे डोळे आभाळाकडे

पाऊस कधी पडेल आणि पेरणी कधी सुरू होणार याच एका प्रश्नाची चर्चा सध्या गावागावातील पारावर रंगताना दिसत आहे

पुढारी वृत्तसेवा

शिवनाथ जाधव

टाकरवन : जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटून गेला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिन झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीचे कामे वेळेत पूर्ण केली खरी मात्र आता पावसाअभावी त्यांच्यावर केवळ दिवस मोजण्याची वेळ आली आहे. जून चा निम्मा महिना कडक उन्हात गेल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे.

माजलगाव तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये काही ठिकाणी केवळ किरकोळ सरी कोसळल्या मात्र हा पाऊस पेरणीसाठी अत्यंत अपुरा आहे त्यामुळे शेतकरी रोज सकाळी सायंकाळी चातकासारखी आभाळाकडे नजर लावून बसला आहे. पाऊस कधी पडेल आणि पेरणी कधी सुरू होणार याच एका प्रश्नाची चर्चा सध्या गावागावातील पारावर रंगताना दिसत आहे.

पेरणीची तयारी पूर्ण पाऊस मात्र गायब...

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे खते आणि इतर कृषी साहित्य शेतकऱ्यांनी आधीच खरेदी करून ठेवले आहेत मात्र पावसाने दडी मारल्यामुळे ही सर्व तयारी सध्या धूळखात पडून आहे. हवामान अंदाजावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पूर्व मशागत पूर्ण केली परंतु पाऊस लांबल्यास जमिनी पुन्हा दुबारमशागत करावी लागेल ज्यामुळे शेतीचा खर्च दुप्पट होण्याची भीती व्यक्त होत आहे पाऊस लांबल्यामुळे जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पाऊस लांबल्यामुळे केवळ पेरण्या रखडल्या नाही तर जनावराच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ग्रामीण भागातील फेरी आणि इतर जलस्रोतांची पाणी पातळी कमालीची खालावली आहे.

ऊस पिकाला पाणी द्यायची कसे..?

उजवा कालवा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे ऊसे नगदी पीक असल्याने त्यासाठी पाण्याची मोठी गरज असते मात्र याच मुख्य उजव्या कालव्याचे पाणी गेल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहे आता जर निसर्गाचा पाऊस पडला तरच हाऊस वाचेल अन्यथा ऊसाला पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न सध्या देखील शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनाचा अभाव ?

अर्धा जून महिना संपला तरी पावसाची हुलकावणी असल्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला असून खरीप पेरणी कधी व कशा पद्धतीने करावी या विषय मार्गदर्शन देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक कृषी सहाय्यक आहे परंतु कृषी सहाय्यक सर्व कारभार तालुक्याहून हकत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनाचा अभाव पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नेमकी पेरणी कधी करावी याविषयी सखोल माहिती देण्याकरता कृषी सहायकाने गावात येणे बंधनकारक असताना देखील ते येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT