Dhananjay Deshmukh  File Photo
बीड

निवडणूक तब्बल 16 महिन्यांनी झाली...; पहिल्या सहा महिन्यात निवडणूक झाली असती तर वेगळा इम्पॅक्ट

massajog sarpanch election: स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; यापुढील राजकीय लढाई सर्वांना विचारात घेऊन लढणार

पुढारी वृत्तसेवा

केज : तालुक्यातील मसाजोग ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये स्वरूपानंद देशमुख हे विजयी झाले आहेत. तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला.

या पार्श्वभूमीवर आता धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्यामते पहिल्या सहा महिन्यात जर निवडणूक झाली असतील तर वेगळे चित्र दिसले असते. परंतु तब्बल 16 महिन्यांनी ही निवडणूक झाली. या कालावधीत आम्ही सर्वजण न्यायालयीन लढाईत होतो त्यामुळे गावकऱ्यांची तेवढा संपर्क ठेवता आला नव्हता. त्यामुळे असा निकाल लागला असावा परंतु आम्हाला हा पराभव मान्य आहे.

राजकीय लढाई वेगळी व संतोष देशमुख यांच्या न्यायाची लढाई वेगळी त्या लढाईमध्ये सर्व गावकरी आमच्या पाठीशी राहतील. तसेच यापुढील राजकीय वाटचाल ही सर्वांना विचारात घेऊन सुरू ठेवणार असल्याचे देखील धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT