वडीगोद्री : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती येथे आमरण उपोषणास बसलेल्या माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरात शेतकरी संघटनांकडून चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. रविवार १५ जून रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे सकाळी १० वाजता रस्ता रोको सर्वांनी गटतट सोडून जगाच्या पोशिंद्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा.
मी स्वतः शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर शेतकरी संघटनांच्या एकत्रित चक्का जाम आंदोलनात उतरणार असल्याचे यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. प्रहार चे नेते बच्चू कडू यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसांचं काम बाजूला ठेऊन चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हावं असेही आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत असून सर्व शेतकऱ्यांनी 15 जून रोजी शेतकरी संघटनांकडून करण्यात येणाऱ्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होऊन बच्चू कडू यांना पाठिंबा द्यावा असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.