Manoj Jarange Patil pudhari
बीड

Manoj Jarange Patil: मराठा बांधवांनी सरकारला दिली ऑफर; पाडोद्यात या अन् मागण्या मान्य करा

Anirudha Sankpal

Manoj Jarange Heath Update: मुंबईकडे रवाना झालेला मनोज जरांगे पाटील हे सध्या पाटोद्यात असून मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळं मराठा बांधवांमध्ये चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी पुढारीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकतर सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या पाटोद्यात येऊन पूर्ण कराव्यात किंवा जरांगे पाटील यांनी उपचार घेऊन लढा सुरू ठेवावा. अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे काल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी संपूर्ण गाव त्यांच्या गाडीभोवती जमलं होतं. गावकरी तसेच कुटुंबीयांनी मनोज जरांगे यांना भावनिक निरोप दिला.

मनोज जरांगे यांचा ताफा शहागड आणि गेवराई शहरामार्गे रात्री सातच्या सुमारास बीड शहरात दाखल झाला. बीड शहरात जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती.

बीड शहरातून हा ताफा बाहेर पडण्यासाठी जवळपास ३ तास लागले. रात्री दहाच्या सुमारास जरांगे पाटील यांचा ताफा बीड शहरातून पाटोदाच्या दिशेने रवाना झाला. मध्यरात्री पाटोद्यात पोहचल्यानंतर जरांगे पाटील यांनी सुमारे २ वाजता मराठा बांधवांना संबोधित केलं.

आमचा समाज कोणतंही सरकार पाडू शकतो

या संबोधनात जरांगे पाटील म्हणाले की, 'तुमच्यासमोर खाणखणीत बोलत असतो. माझ्यासाठी माझा समाज फार महत्वाचा आहे. आपल्यासाठी कोणी नाही हे लक्षात ठेवा. आपला समाज आपल्याला मोठा करायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की लढायला शिका. सगळ्यांची लेकरं AC मध्ये बसली आहेत. मी चांगल्या चांगल्यांना जेरीस आणतो. मी घाबरलेलो नाही, खचलेलो नाही.

यावेळी जनतेतून तुम्ही सलाईन घ्या अशी मागणी झाली. त्यावर जरांगे यांनी तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतलं आहे. समाजासाठी लढताना शरीर थकले. सरकारला वाटतं मी त्यांना शरण यावं. पण मी मागणी सोडून देऊ का सरकारपेक्षा माझा समाज मोठा आहे. माझा समाज कोणतेही सरकार पाडू शकतो. दुसरे आणू शकतो.'

सलाईन सोडल्यापासून पुन्हा त्रास

ते पुढे म्हणाले की, मी मरून जाईन पण मान खाली घालू देणार नाही. आजचा प्रवास मोठा झाला. मी समाजाला सांगतो होतो की तुम्ही येऊ नका. मला एकट्याला जायचं आहे.

मी गेली २४ वर्षे हे काम करत आहे दोनवेळा मुंबईत गेलो. आज उपोषणाचा १८ वा दिवस आहे. सलाईन घेतलं म्हणून बरं वाटलं. मात्र १२ तारखेला सलाईन सोडल्यापासून पुन्हा त्रास होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT