महाराष्ट्रभर फिरून प्रत्येकाचा हिशोब करणार : पंकजा मुंडे File Photo
बीड

महाराष्ट्रभर फिरून प्रत्येकाचा हिशोब करणार : पंकजा मुंडे

पुढारी वृत्तसेवा

सावरगाव, पुढारी वृत्तसेवा : गोपीनाथ मुंडे की बेटी हू अशी शेरोशायरी करत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात तडाखेबाज भाषण केले. चारीत्र्यसंपन्नतेचे प्रतिक असलेल्या भगवान बाबा यांची मी लेक आहे, माझा लोकसभेत पराभव झाला तर अनेकांनी आपला जीव दिला. तुमचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र अशी राज्याच्या काणाकोपर्‍यात येणार आहे, प्रत्येकाचा हिशोब करणार आहे. असा इशारा सर्वांना दिला आहे. पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या, मोठ्या स्वाभिमानाने भगवान बाबांच्या जन्मगावी दसरा मेळावा सुरू केला. लोकांनी देखील तेवढीच साथ आणि सोबत दिली. जीएसटीचा छापा पडला तर 12 कोटी जमा केले. लोकसभेला पराभव झाल्यांनरत अनेकांनी आपला जीव दिला. यामुळे पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव तुमच्यावर आहे, असे उपस्थितांना पंकजा मुंडे म्हणाल्या. स्व. मुंडे यांच्यापासून आठरा पगड जाती- धर्माचे लोक या दसरा मेळाव्याला येतात. जळगाव, नाशिक, बुलढाणा, येवळा, गंगाखेड, नांदेड, आकोल, वाशिम, पुणे, पिंपरी चिंचवड, परभणी- गंगाखेड असे, सार्‍या राज्यभरातून आठरा पगड जातीतून माझे बांधव आले आहेत. तसेच, परळीतून धनुभाऊंना आमदार होणारच असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी धनंजय मुंडे, महादेव जाणकर, सुजय विखे, सुरेश धस, भिमराव धोडे, कर्डीले, मोनिका राजळे, नमिता मुंदडा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

आमच्या गोरगरीब लोकांना त्रास देणारांना हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी चांगलीच फटकेबाजी केली. या पवित्र दसरा मेळाव्याची आगळी- वेगळी परंपरा आहे. भगवान बाबा पवित्र सोने द्यायचे. बाबांच्या नंतर स्व. मुंडे यांंनी तर नंतर पंकजा यांनी ही परंपरा संभाळली. हा राजकरणाचा नव्हे तर भक्ती, शक्ती आणि परंपरेचा दसरा मेळावा असल्याचे ते म्हणाले. संघर्ष बाबा, साहेब, ताई अन् माझ्याही वाट्याला आला आहे.. परंतू संघर्षाने कधी खचलो नाही. संत महंतांनी कधीही जाती- पातीसाठी काम केले नाही.. छत्रपती शिवराय अथवा भगवान बाबा यांनी एका जातीसाठी काम केले नाही. 1960 साली यशवंतराव चव्हाण भगवान गडावर आले. यावेळी गडाला काय नाव द्ेऊ असा प्रश्‍न भगवान बाबा यांना पडला.. यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, तुमच्या नावात भगवान आहे, भगवान गड हेच नाव द्या, असे ते म्हणाले. मी 12 वर्ष विरोधात होतो परंतू कधी वेगळा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केला नाही, तुम खुब कोशिश करो, हम जब जब बिखरेंगे, दुगणी रफ्तार से निखरेंगे असा शेर सांगत ना. मुंडे यांनी भाषण संपवले.

भगवान भक्ती गडावर अनेक पालख्या येणार

लक्ष्मण हाके, म्हणाले, निवडणुका येतात आणि जातात परंतू जातीवाद बरा नव्हे. सर्व जाती धर्माच्या माणसांना सोबत घेणारे, ज्याच्या पाठीवर हात ठेवतील त्याला आमदार करणारे स्व. लोकनेते मुंडे होऊन गेले. भगवान बाबांनी शेती विका पण पोरं शिकवा हा कानमंत्र सर्व जाती-धर्मांना दिला. अगामी काळात भगवान गड अन् भक्ती गडावर संत बाळू मामा, पोहरादेवी, जेजूरीचा खंडोबाची पालखी येणार असल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT