महिलांना प्रोत्साहन, शक्ती देण्यासह सन्मानही मिळावा : पंकजा मुंडे

Pune रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्राच्या धागा प्रदर्शनाचे उद्घाटन
Pankaja Munde
आमदार पंकजा मुंडे Pudhari
Published on
Updated on

महिला कुटुंब सावरण्यात हातभार लावते. महिलेने केवळ घर सांभाळावे आणि पुरुषांनी बाहेर कमवावे, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. तिच्या अंगी कलाकुसर, सचोटी, प्रामाणिकता, जिद्द, नीटनेटकेपणा असतो. एखाद्या गोष्टीसाठी आपण महिलांना प्रोत्साहन देतो; शक्ती देतो. मात्र, त्यांना शक्तीसोबत सन्मानही मिळाला, तर त्या विविध क्षेत्रात यशाची शिखरे गाठतात, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे यांनी केले.

रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित धागा या स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संयोजक व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्टच्या संचालक शीतल आगाशे, एमएसएमईचे सहसंचालक मिलिंद बारापात्रे, उपसंचालक अभय दफ्तरदार, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, जयंत भावे उपस्थित होते. गोल्डन लीफ लॉन्स, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे हे प्रदर्शन रविवारपर्यंत (दि.6) सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत विनामूल्य खुले राहील. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी व्यासपीठ देण्याचा उद्देश यामागे आहे. उद्योजिकांची वीण घट्ट करणारा हा धागा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news