Mahadev Munde murder case Dnyaneshwari Munde's sensational allegation against Valmik Karad
बीड : पुढारी वृत्तसेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी बंगल्यावरून फोन आला, तो फोन वाल्मीक माहिती आम्हाला कराडनेच केल्याची आहे, पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा, असा खळबळजनक आरोप मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश् वरी मुंडे यांनी केला आहे. बुधवारी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा खळबळजनक खुलासा केला.
माझ्या मुलांमध्ये बदल्याची भावना निर्माण होत आम्हाला आहे. आयुष्यभर परळीत रहायचे आहे. माझ्या मुलांचे काही बरेवाईट झाले अथवा त्यांच्या हातून एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार? असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात अनेक तपास अधिकारी बदलले परंतु आरोपीपर्यंत पोलिस पोहचू शकलेले नाहीत.
याचा अर्थ प्रशासनावर कोणाचा दवाव होता का? परळीत धनंजय मुंडे यांचा बंगला आहे, त्यांना वाल्मीक कराड काय करत होता हे माहिती नाही. त्याच बंगल्यातील कार्यालयातून वाल्मीक कराडने या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी फोन केल्याची माहिती असून पोलिसांनी त्या वेळचे सीडीआर काढावेत, अशी मागणी ज्ञानेश्-वरी मुंडे यांनी केली आहे.
आठ दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशारा देऊनदेखील पोलिसांनी गतीने तपास केला नाही. त्यामुळे माझ्यासमोर आत्मदहनाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, त्यामुळे आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आलो होतो. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले होते. पोलिस अधीक्षकांच्या भेटीनंतर परत जाण्यापूर्वी त्यांनी विष प्राशन केल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. आता महिनाभरात तपास न लावल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.