Beed News : बीड जिल्ह्यातील ९७ हजार शेतकऱ्यांना झाली कर्जमाफी file photo
बीड

Beed News : बीड जिल्ह्यातील ९७ हजार शेतकऱ्यांना झाली कर्जमाफी

आधार पडताळणी तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Loan waiver for 97 thousand farmers in Beed district

बीड, पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील १ हजार ३०५ गावांमधील एकूण ९७ हजार २२२ शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची यादी जाहीर करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सतीश तोटावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीर करण्यात आलेल्या यादीत राष्ट्रीयीकृत बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची नावे, कर्जाची रक्कम आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी विशिष्ट क्रमांक नमूद करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सध्या ४३८ 'आपले सरकार' सेवा केंद्रे कार्यरत असून, पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

या प्रक्रियेनंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पडताळणीसाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे पासबुक, बचत खात्याचे पासबुक, यादीतील नावासमोरील विशिष्ट क्रमांक तसेच अग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी आवश्यक आहे.

दरम्यान, कर्जमाफीची यादी संबंधित सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, बँक शाखा आणि सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांना पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाह देण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील ९७, २२२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

११ तालुके, १,३०५ गावांचा समावेश

४३८ 'आपले सरकार' सेवा केंद्रांवर पडताळणीची सुविधा

आधार प्रमाणीकरण व अग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

आवश्यक कागदपत्रांसह तातडीने पडताळणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT