Labourer Death  Pudhari
बीड

Beed News : परळी तालुक्यात छळाला कंटाळून मजुराने जीवन संपवले

पैशाच्या धक्कादायक कारणावरून वारंवार होणारी जातीय शिवीगाळ आणि दमदाटीला कंटाळून एका मजुराने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Laborer Ends Life in Parli Taluka, Driven to Despair by Harassment

परळी पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या धक्कादायक कारणावरून वारंवार होणारी जातीय शिवीगाळ आणि दमदाटीला कंटाळून एका मजुराने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ माजली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुंडलीक पिराजी वैराळ (रा. पौळ पिंपरी) यांनी २० मार्च २०२६ रोजी रात्री ११ ते २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुताच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

याप्रकरणी मयताच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखलची पत्नी शांताबाई कुंडलीक वैराळ (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ (रा. पौळ पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी राम पौळ हा पैशाच्या वादातून कुंडलीक यांना वारंवार जातीवाचक शिवीगाळ करत होता आणि जीवे मारण्याची दमदाटी करत होता.

या सततच्या मानसिक छळाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून कुंडलीक वैराळ यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप करण्यात आला आहे. सिरसाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची अधिकृत नोंद २२ मार्च रोजी करण्यात आली असून, पुढील तपास माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT