केज : केज शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला असून एका मोकाट श्वानाने शहरातील सहा जणांना चावा घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज शहरात दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास शहरातील महात्मा फुले नगर भागात एका मोकाट श्वानाने सामाजिक कार्यकर्ते राहुल वाव्हळे, निलिमा जोगदंड, सोनू राऊत यांच्यासह सहा जणांना एकाचवेळी चावा घेतला.
दरम्यान शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असल्याने त्याचा बंदोबस्त करून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मागणी होत आहे. तर या बाबत नगर पंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. त्याच बरोबर पाळीव श्वानांच्या मालकांनी त्यांच्या श्वानांचे लसीकरण आणि परवाना घेणे देखील आवश्यक आहे.