

Gram Panchayat Member Arrested in Kej
केज : महिलेचा पती बाहेरगावी असल्याचा गैरफायदा घेऊन रात्री घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित ग्रामपंचायत सदस्याला ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा पती हा मागील काही दिवसांपासून मजुरीसाठी बाहेरगावी गेला आहे. दि. ११ जून रोजी ती महिला तिच्या मुलाला घेऊन घरात पलंगावर झोपली होती. त्यावेळी रात्री ११ वाजता तिने अचानक उठून पाहिले असता बालू बिभीषण चिंचकर हा ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या घरात येऊन पलंगावर झोपलेला होता. त्याने महिलेच्या हाताला धरून तिचा विनयभंग केला. त्या महिलेने आरडाओरड केल्या नंतर नातेवाईक जमा झाले आणि त्याला चांगलाच बदडून काढला.
दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादी वरून ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.