पोलिसांची कारवाई; दारू वाहतूक उघड pudhari photo
बीड

Illegal liquor transport : पोलिसांची कारवाई; दारू वाहतूक उघड

कारचालक अंधाराचा फायदा घेऊन फरार

पुढारी वृत्तसेवा

केज : केज पोलिसांनी अवैधरीत्या दारू वाहतूक करणारी एक कार पकडून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईदरम्यान कारचालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्र गस्तीदरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाल करणाऱ्या कारबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून संबंधित वाहन अडविले. वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे 99 हजार रुपये असून कारसह एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.कारमध्ये दारूच्या बाटल्यांसोबत काही साहित्यही आढळून आल्याने संबंधित व्यक्ती बनावट दारू निर्मिती व्यवसायाशी संबंधित असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT