₹3.94 Lakh Ganja Seized
केज : केज तालुक्यातील सुर्डी येथे शेतातील पिकात ३ लाख ९४ हजार रु. किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जून रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सुर्डी ता. केज येथील शिवारात सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे शेतातील पिकात गांजाची झाडे आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्यासह आणि प्रत्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून पंचा समक्ष कारवाई केली.
यावेळी केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारी, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, अनिल मंदे, बालाजी डापकर, राजू गुंजाळ, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या समक्ष कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचे वजन १९.७०० किलो ग्रॅम भरले आहे.
जप्त केलेल्या गांजाची किंमत ३ लाख ९४ हजार रु. आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
युसुफवडगाव पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० अन्वये पोलिस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.