केज : अंबाजोगाई येथून केजच्या दिशेने चाललेल्या ट्रॅव्हल्स व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) रात्री होळ (ता. केज ) येथे घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दत्तात्रय बबन फुगारे (वय ३५ वर्ष) रा. होळ आणि संतोष भडके (वय ३२ वर्ष) रा. मोरवड ता. रेणापूर (जि.लातूर) हे दत्तात्रय फुगारे यांच्या शेतात सालगडी म्हणन कामाला आहे.
ते दोघे बुधवारी रात्री दुचाकी क्र. (एम एच-४४/एन-८४१८) वर बसून हॉटेलवर जेवण्यासाठी गेले होते. जेवण करुन ते परत शेतात जाताना अंबाजोगाई कडून केजच्या दिशेने चाललेली ट्रॅव्हल्स क्र. (एम एच- २४/ए टी-९९००) याने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रय बबन फुगारे रा. होळ आणि संतोष भडके दोघेही ठार झाले आहेत.