Kapildharwadi, Hingani Khurd to be rehabilitated
बीड, पुढारी वृत्तसेवा : मौजे कपिलधारवाडी व मौजे हिंगणी खुर्द (ता. बीड) या गावांच्या पुनर्वसनासंदर्भात शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत पुनर्वसन प्रक्रियेतील आवश्यक टप्प्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन पुनर्वसनाचे काम नियोजनबद्ध व तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अप्पर जिल्हधिकारी हरिष धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संगीता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत, जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख शिंदे, कार्यकारी अभियंता तोंडे, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार बीड चंद्रकांत शेळके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, तसेच महसूल, ग्रामविकास, पोलिस, पाणीपुरवठा, महावितरण, आरोग्य, भूमिअभिलेख आदी विभागांचे अधिकारी तसेच संबंधित गावांचे सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते.
पुनर्वसन प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणी, पर्यायी स्थळांची निवड आणि आवश्यक मूलभूत सुविधांची उपलब्धता यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनामार्फत पुनर्वसित नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.