Beed News : पूरग्रस्त भागातील रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती होणार

डॉ. योगेश क्षीरसागर यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा; चौसाळा ते वाढवणा रस्त्यावर दोन पूल होणार
Beed News
Beed News : पूरग्रस्त भागातील रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती होणार File Photo
Published on
Updated on

Roads and bridges in flood-affected areas will be repaired

बीड, पुढारी वृत्तसेवा बोड व शिरूर कासार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांसह पुलांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बीडमध्ये गुरुवारी (दि.९) चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Beed News
Agricultural loss : अतिवृष्टीमुळे पावणेसात लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून चौसाळा परिसरातील पुलांच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आढावा घेऊन डॉ. योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांना परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर करण्यास सांगितले.

या प्रस्तावात चौसाळा पिंपळगाव घाट-वाढवणा रस्ता (इजिमा-४८) येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीवाक्त बैठकीत सूचना देण्यात आल्या. या बैठकीत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, उपअभियंते पी. बी. जोगदंड, एच.डी. शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Beed News
Beed News : कपिलधारवाडी परिसराला बहुआयामी धोका

या रस्त्यांची होणार दुरुस्ती या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघातील एनएच ५६१ ते एसएच-५९ नवगण राजुरी ते सोनगाव रोड, एमआरएल-१३ नाळवंडी ते डेकणमोहा, व्हीआर-१२-लक्ष्मीआई तांडा, एमडीआर-३१-बीडजवळ, आहेर धानोरा ते वरवटी, भाळवणी ते बेलेश्वर, एसएच-५५ म्हाळसजवळा, राजापूर, वाकनाथ रोड, एसएच-५६-म्हाळसापूर ते पिंपळगाव, राक्षसभुवन, कुकटगाव, एसएच-५६-लिंबागणेश, काटवटवस्ती, अंजनवती, घारगाव, एनएच-२११ मोरगाव ते देवऱ्याचावाडा, एमएसएच-१६ डेकणमोहा ते कारळवाडी, निर्मळवाडी, एनएच-२११ कर्झनी (ब) ते कर्झनी (क), एसएच-६३ आर्वी, तरडगव्हाण ते गाजीपूर रोड, गात शिरापूर, एसएसएच-१६ डेकणमोहा ते आंबेसावळी, मन्यारवाडी रोड, एसएच-५५ उमरद (क) ते नागापूर बुद्रुक, ब्रन्हानपूर रोड, एसएच-६४ देवीबाभुळगाव रोड, एमएसएच-१६ काळेगाव हवेली रोड, एसएच-५५ गंगनाथवाडी रोड, एमएसएचब-१६ काठोडा ते वांगी रोड, एसएच-५६ मुळूकवाडी ते मसेवाडी रोड, ओडीआर-५० नरनाळे ते डोईफोडेवस्ती रोड, एसएच-५५ इट तांडा रोड, ओडीआर-११३ मेंगडेवाडी रोड, ओडीआर-११३ धुमाळवाडी रोड, ओडीआर-४८ तेलपवस्ती ते मानेवाडी रोड, एमडीआर-१९ रुपेवाडी रोड, ओडीआर ४७-मांडवजाळी ते भाळवणी रोड, एसएच २६-खंडाळा ते ढाळेवस्ती रोड, एनएच २११ धनगरवाडी रोड, ओडीआर-११५ फुकेवाडी रोड, वंजारवाडी ते भगवाननगर रोड, आहेर धानोरा ते राममंदिर इंगोळे पूर्व वरवटी रोड, एमएसएच-१६ वंजारवाडी चन्हाटा रोड-तांदळवाडी ते सिसरटवस्ती, एसएच-२११-कोळवाडी, एसएच-२११-वानगाव पाईसावस्ती, बोरखेडवस्ती ते बोरखेड-गोलांग्री, एमडीआर-२८ शाहाबाजपूर सानपवस्ती, एनएच-२११ आहेरवडगाव ते काटवडा रोड, खांबालिंबा पौंडूळ ते नारायणगड, केतुरा रोड, एमडीआर-२८ गाजीपुर, एमएसएच-१६ मैदा, एमडीआर-२८-वासनवाडी ते लक्ष्मीनगर, एसएच-२३२ परभणी ते केसापुरी, एमडीआर-३२-बोरफडी ते मोहगीरवाडी, लक्ष्मीनगर, एमडीआर-१८ चव्हाणवाडी, एमडीआर-१८ खुडूस, ओडीआर-५१-चांदेगाव, ओडीआर-५१ जाधववस्ती, एसएच-५५ खांडेपारगाव, एसएच-५५-अंधरवनपिंप्री, एमडीआर-२८ गाजीपूर ते शिरूर (कासार) या रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे.

रस्त्यांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव

प्रलंबित कामांना गती देण्यासाठी तसेच देखभाल निकषात न बसणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाकडे निधीसाठीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिल्या. त्याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news