Molestation Pudhari
बीड

Beed women molestation| सत्ताधारी राजकीय पक्षाच्या विधवेचा कार्यकर्तीचा दिरानेच केला विनयभंग

दिरा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : राज्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या विधवा कार्यकर्तीच्या घरात घुसून तिच्या दिरानेच लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या एका राजकीय पक्षाच्या आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या, केज तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्तीच्या पतीचे सात वर्षां पूर्वी निधन झालेले आहे.

ती विधवा महिला एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती आहे. त्याचा गैरफायदा घेत त्या विधवा कार्यकर्तीच्या दिराने तिच्या घरात घुसून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तिला खाली पाडून लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. तसेच तिच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी तोडून घेतली.

जर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यांची झटापट सुरू असताना महिलेचा मुलगा आल्याचे पाहून संशयित आरोपी त्या महिलेचा दिर पळून गेला. पीडित महिलेच्या तक्रारी वरून तिच्या दिरा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT