Is Beed district the one with the highest number of child marriages?
बीड, पुढारी वृत्तसेवा सर्वाधिक बालविवाह असणाऱ्या बीड जिल्ह्यात आपले स्वागत... अशा आशयाचे एक बॅनर गेवराई परिसरात काही दिवसांपूर्वी लावले होते. ते सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हे बॅनर कोणी लावले, कोणी व्हायरल केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यामुळे बीड जिल्ह्यातील बालविवाहाचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत.
युनिसेफ च्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होतात. ऊसतोड मजुरांचे स्थलांतर अथवा कामाच्या शोधात शहरी भागात होत असलेल्या स्थलांतरामुळे असे प्रकार घडत आहेत. कमी वयात लग्न झालेल्या मुलींना मानसिक ब शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. असे प्रकार होऊ नयेत याकरिता प्रशासकीय पातळीवर जनजागृतीबरोबरच कारवाई देखील केली जात आहे.
यातच गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर-धुळे महामार्गावर लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये सर्वाधिक बालविवाह असलेल्या बीड जिल्ह्यात आपले स्वागत... असा मजकुर लिहीलेला आहे. यावर वर्षाला पाच ते सहा हजार बालविवाह होत असल्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने हे बॅनर नेमके कोणी लावले, त्याचा उद्देश काय? हे समोर आले नसले तरी बीड जिल्ह्यातील बालविवाहाचे भयाण वास्तव याद्वारे समोर आल्याने आता चर्चा होऊ लागली आहे.
आता लग्नसराई सुरु झालेली असल्याने प्रशासन बालविवाह देखील सतर्क थांबवण्यासाठी झाले असून स्वयंसेवी आहेत. संस्थांच्या मदतीने उपाययोजना केल्या जात आहे.