Pankaja Munde : भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला मी येतेय... तुम्हीही सुखरूप या file photo
बीड

Pankaja Munde : भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला मी येतेय... तुम्हीही सुखरूप या

आपला दसरा, आपली परंपरा; मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन, दसरा मेळाव्याला प्रशासनाने दिली परवानगी

पुढारी वृत्तसेवा

I am coming to the Dussehra rally at Bhagwan Bhaktigad Pankaja Munde

बीड पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची दरवर्षीच उत्सुकता असते. लाखोंची गर्दी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असते. या अनुषंगानेच आपली परंपरा, आपला दसरा साजरा करण्यासाठी मी येत आहे, आपणही या पण सुखरूप या व घरी सुखरूप परत जा असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

भगवान भक्तीगडावर होणारा दसरा मेळावा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून या दसरा मेळाव्याची ओळख आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो. यंदाचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी असणार आहे.

या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक लाखोंच्या संख्येने भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात. संत भगवान बाबाची जन्मभूमी असल्याने सावरगाव घाट येथे होणाऱ्या या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. सावरगाव घाट येथे पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचत असलेली राष्ट्रसंत भगवान बाबाची भव्य मूर्ती आणि तळघरात भगवान बाबांची मूर्ती अशा स्वरूपाची भव्य वास्तू येथे असुन या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय दरवर्षी उपस्थित असतो. या पार्श्वभूमीवर भगवान भक्तीगडावर मेळाव्याची तयारी सुरु आहे.

या अनुषंगानेच मंत्री पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओ द्वारे समर्थकांना आवाहन केले आहे. आपला दसरा आणि आपल्या परंपरेसाठी मी भगवान भक्तीगडावर येत आहे तुम्ही पण या, सुखरूप या आणि सुखरूप परत घरी पुरणपोळी खाण्यासाठी पोहचा असा भावनिक संदेश दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT