वृद्ध शेतकऱ्याने जीवन संपवले, अतिवृष्टीत शेती व संसारोपयोगी साहित्याची डोळ्यांदेखत झाली होती माती..  File Photo
बीड

वृद्ध शेतकऱ्याने जीवन संपवले, अतिवृष्टीत शेती व संसारोपयोगी साहित्याची डोळ्यांदेखत झाली होती माती..

ढाकणे हे शेतकरी बोरीचामळा या शेतामध्ये आपले पत्र्याचे घर थाटून शेती करत होते.

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains damage farm and house, old age farmer ends life

शिरूर, पुढारी वृत्तसेवा : वावी येथील वृद्ध शेतकऱ्याने दि.१९ रोजी विष प्राशन तालुक्यातील केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि. २१ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

बबन आश्रुबा ढाकणे (६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ढाकणे हे शेतकरी बोरीचामळा या शेतामध्ये आपले पत्र्याचे घर थाटून शेती करत होते. झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला नाल्याचे पाणी पाठीमागे फुगवटा आल्याने घरामध्ये आणि शेतामध्ये घुसले. शेतातील बाजरी कापूस आदी पिके तर जमीनदोस्त तर केलीच पण घरातील संसार उपयोगी साहित्य याची डोळ्यात देखत माती केली. याचा मोठा धक्का शेतकरी बबन आश्रुबा ढाकणे यांना लागला होता. अतिवृष्टीने डोळ्यादेखत संसाराची माती केली झालेल्या नुकसानीमुळे आश्रुबा ढाकणे हे पुरतेच निराश झाले होते.

घरामध्ये काही नाही आणि दिवाळीचा सण आला आहे याच निराशेपोटी आश्रुबा ढाकणे यांनी रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ढाकणे यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने गंभीर होत चालल्याने पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मृत्यू झाला आहे. बबन ढाकणे यांच्या पश्चात पत्नी शहाबाई ववन ढाकणे, संतोष बबन ढाकणे, गणेश बबन ढाकणे असे दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. सहा महिन्यापूर्वीच बबन ढाकणे यांचा दोन नंबरचा मुलगा सुरेश ढाकणे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या दुः खातून ढाकणे परिवार सावरतो ना सावरतो तोच हा दुर्दैवी दुःखाचा डोंगर ढाकणे परिवारावर पुन्हा एकदा कोसळा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT