औंढा नागनाथ : औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात सलग चौथ्या दिवशीही दिनांक 15 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत ढगफुटी सदस्य मुसळधार पाऊस कोसळला असून तालुक्यातील जवळा बाजार, येहळेगाव सोळंके साळणा, औंढा नागनाथ या मंडळात ढगफुटी सदस्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची खरीपातील सोयाबीन कापूस सह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यातून होत आहे गोजेगाव येथेही तळ्याचे पाणी गावालगतच्या ओढ्यावरून जात असल्याने गेल्या अनेक तासापासून निम्म्या गावचा संपर्क तुटला आहे. तर औंढा नागनाथ शहरातील नागेश्वर नगर येथे सकल भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. दरम्यान तालुक्यात कुठेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सायंकाळी चार वाजता दिली आहे.