Beed Crime News : कर्ज फेडण्यासाठी चक्क सोनाराला लुटले  File Photo
बीड

Beed Crime News : कर्ज फेडण्यासाठी चक्क सोनाराला लुटले

साठ लाखांच्या लूट प्रकरणात चौघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

He robbed a jeweler to pay off his debts

बीड, पुढारी वृत्तसेवा : तालखेड फाटा-माजलगाव येथे झालेला ६० लाखांचा दरोडा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह ज्वेलर्स दुकानात कारागिर म्हणून काम करणाऱ्या इसमास अटक व त्यांचेकडून १८ तोळे सोने व १ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. पुर्वी कारागिर म्हणून काम करणाऱ्या तरुणानेच इतर मित्रांना सोबत घेत ही लूट केल्याचे तपासात समोर आले.

दिनांक २५ जानेवारी रोजी माजलगाव येथील सोनार दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके (रा. भाट वडगाव ता. माजलगाव) हे त्यांचे माजलगाव येथील अमोल सोन्याचे दुकानातून आठवडी बाजारात खेर्डा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्यांचे हिरो होंडा पॅशन मोटार सायकलवर पुतण्यसाह जात असताना पाठीमागून स्प्लेंडर मोटार सायकलवर येऊन त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले, गायके यांनी गाडी थांबविल्यावर त्यांना स्प्लेंडरवरील तीन इसमांनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांचेकडील सोन्या-चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळून गेले. त्यावरून पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण गुन्हा दाखल झाला.

गुन्हा घडल्यापासून पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना आदेशीत केले की, सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.

असा रचला लुटीचा कट

अधिक विचारपूस चारपूस करता करता एकनाथ कपाले यांनी सांगितले की, माजलगाव येथील सोनार दुकानदार यांच्या आठवडी बाजारात जाण्याचे वार व वेळ माहिती होती. त्यामुळे नारायण याने माजलगाव येथील सोनार दुकानदारास लुटण्याचे ठरिवले. त्यानुसार एकनाथ कपाले याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे व अभिषेक शिंदे यांना त्याचा प्लॅन सांगितला. त्यानुसार त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मित्र नामे संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे व विशाल सूर्यकांत सुळ यांना सदर कटात सामील केले. प्लॅन नुसार दिनांक २५ रोजी हिरो होंडा स्प्लेंडरवर एकनाथ कपाले व संजय कांबळे यांनी फिर्यादी यांचे रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT