He killed his wife by throwing a stone at her head
बीड, पुढारी वृत्तसेवा : चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ५७ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा निघृण पद्धतीने पतीने खून केल्याची घटना सोमवारी पहाटे आनंदवाडी येथे घडली आहे. रात्री उशीरपर्यंत पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांनी दिली. पहाटेच्या सुमारास साखरझोपेत असलेल्या पत्नीला डोक्यात दगड घालून संपविण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडीमधील भिवसाबाई विष्णू कदम (वय-५७) असे मृत महिलेचे नाव आहे. भिवसाबाई यांचा पती विष्णू गणपत कदम याने डोक्यात दगड घालून सोमवारी (दि. १६) पहाटे ४ च्या सुमारास खून केला. माहितीनुसार विष्णूचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधाला पत्नी अडथळा ठरू लागल्याने त्याने पत्नीचा डोक्यात दगड घालून केला.
पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडल्याने एकच उडाली. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून चकलांबा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सायंकाळी ६ च्या सुमारास आनंदवाडीमध्ये भिवसाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पती हा फरार झाला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुलगा घरात असताना घडली घटना
विष्णू कदमने ज्या घरात पत्नीचा काटा काढला ते घर दोन खोल्यांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगा चालक असल्याने तो बाहेर जिल्ह्यात व राज्यात जात असे. सोमवारी नेमकाचा तो घरी आला होता. त्यानंतर आई मुलाला पुढच्या रूममध्ये झोपण्यासाठी जागा देऊन पाठीमागच्या रूममध्ये गेली. पहाटे ४ वाजता आरोपी विष्णूने दोन्ही रूमच्या मध्ये असलेले दार लावून घेत पत्नीच्या डोक्यात दगड घालत पळ काढला होता.