माजलगाव येथे सराफ दुकानातून हातचलाखीने ५० हजारांचे सोने लांबवले. Pudhari Photo
बीड

माजलगाव येथे सराफ दुकानातून हातचलाखीने ५० हजारांचे सोने लांबवले

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा: शहरातील बीड रोडवर असलेल्या देशमुख सराफ या दुकानातून दोन अज्ञात चोरट्यांनी हातचलाखी करून ५० हजार रुपयांचे सोने लांबवले. ही घटना आज (दि. १५) दुपारी घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीड रोडवरील व्यंकटेश कॉम्प्लेक्स मधील देशमुख सराफ या सोने-चांदीच्या दुकानात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी सोन्याचे दागिने बघण्याच्या बहाण्याने सोन्याचे कानातील दागिने दाखवत असताना हातचलाखी करून त्यातील सात ग्रॅमचे दोन कानातील दागिने चोरट्याने अलगद आपल्या खिशात टाकले. त्यानंतर सराफाला बोलण्याच्या नादात गुंगवून हे चोरटे पसार झाले.

सदरील बॉक्सचे वजन कमी भरल्याने शंका आल्याने सराफ दुकानदार सुधाकर देशमुख यांनी तत्काळ त्या बॉक्सचे वजन केले असता ते कमी भरल्याने त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. बाहेर येऊन पाहू पर्यंत चोरटे आपल्या साथीदारांसह दोन मोटर सायकलवरून पसार झाले होते. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशनला सर्व प्रकार सांगून व घटनेचे व्हिडिओ पोलिसांना सुपूर्द केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शिवाजी तळेकर तपास करत आहेत. या घटनेमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT