संतोष अंकुशराव पाचपुते pudhari photo
बीड

Beed Accident : गेवराईत कारची समोरासमोर धडक; एक ठार

दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

गेवराई ः शहरातील नवीन बसस्थानकाजवळील शारदा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर भीषण धडक होऊन संतोष अंकुशराव पाचपुते (रा. गेवराई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन बसस्थानकाकडून येणारी एक कार आणि समोरून येणारी दुसरी कार (क्र. एमएच 12 बीपी 6939 व एमएच 14 जेए 3646) यांच्यात जोरदार टक्कर झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. एका वाहनाचा बंपर व इंजिनचा भाग रस्त्यावर विखुरलेला दिसून आला.

अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतोष पाचपुते यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. संतोष पाचपुते यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, चुलता-चुलती, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT