Beed Crop Damage pudhari photo
बीड

Beed Crop Damage : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळाला

सहा लाखांचे नुकसान; नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी रामप्रसाद मनोहर राऊत यांच्या शेतातील पाच एकर ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या आगीत जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

बेलगाव येथील रामप्रसाद मनोहर राऊत यांच्या गट क्रमांक १२ मधील ऊसाच्या शेतावरून वीजवाहक तारा लोंबकळत होत्या. मंगळवारी दुपारी सोसाट्याचा वारा सुटल्याने या तारांचे घर्षण होऊन ऊसाच्या शेताला आग लागली.

आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेतातील ऊस मोठ्या प्रमाणात जळाला. आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सर्वांच्या मेहनतीमुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT