Beed Fraud Case : बियाणे पुरवठ्याच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक file photo
बीड

Beed Fraud Case : बियाणे पुरवठ्याच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक

राजमा बियाण्याचा उच्च दर्जाचा माल पुरवण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई येथील एका बियाणे व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Fraud of Rs 13 lakhs in the name of seed supply

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा

राजमा बियाण्याचा उच्च दर्जाचा माल पुरवण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई येथील एका बियाणे व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात साताऱ्यातील 'येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी'च्या सहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुयश प्रेमचंद मुथा हे बियाणे व्यवसाय करतात. जुलै २०२५ मध्ये साताऱ्यातील 'येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी'चे संचालक संजय बाबासाहेब भगत व ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेतली. त्यांनी राजमा बियाण्याचे उच्च प्रतीचे नमुने दाखवत मोठ्या प्रमाणात पुरवठ्याचे आमिष दिले.

या विश्वासावर दि. २१ जुलै २०२५ रोजी मुथा यांनी ८५ टन राजमा खरेदीचा करार केला आणि आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. मात्र, करारानुसार मालाची गुणवत्ता तपासण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, दाखवण्यात आलेल्या नमुन्यांप्रमाणे दर्जेदार माल उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT