केज : तालुक्यातील लाखा येथे अज्ञात व्यक्तीने शेतांमध्ये कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या तीन गंजी पेटवून दिल्याची घडली. ही घटना शनिवारी पहाटे (दि.4) घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे चार लाख रपयांचे नुकसान झाले आहे. या बाबतची माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे राहत असलेले नसीब हबीब शेख यांची केज तालुक्यातील लाखा येथे जमीन आहे. त्या जमिनीत त्यांनी सोयाबीन पीक पेरलेले होते. पीक अंदाजे दहा दिवसा पुर्वी पीक काढुन त्याचे तीन ठिकाणी गंजी रचून त्या ताडपत्रीने झाकुन ठेवलेले होते.
शुक्रवारी (दि.४) हसीब शेख यांना सकाळी ७:०० वा. च्या सुमारास त्यांचे शेजारी असणारे अबुन पठाण यांनी त्यांना फोन करून सांगितले की, त्यांच्या शेतातील सोयाबीनचे तिन्ही गंजीला आग लागून त्या जळत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच नशीब शेख आणि त्यांचे नातेवाईक यांनी शेतात जावून पाहिले असता त्यांच्या शेतातील कापणी करून ठेवलेले सोयाबीनच्या तिन्ही गंजी जळून खाक झाल्या असून सुमारे चार लाख रु चे नुकसान झालेले आहे.
या प्रकरणी नशीब शेख यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर हे करीत असून बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनी सोयाबीन जळीत प्रकरणी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला आहे.