माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा कार अपघातात मृत्यू झाला.  (Pudhari Photo)
बीड

R T Deshmukh | लातूर - सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात: माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

Latur Solapur Road Car Accident | बेलकुंड गावाजवळील भीषण अपघातात कारचा चक्काचूर

पुढारी वृत्तसेवा

Latur Solapur Road Car Accident Former MLA R T Deshmukh Death

परळी वैजनाथ: परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला आज (दि.२६) दुपारी लातूर -तुळजापूर- सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड (जि.धाराशिव) गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

माजी आमदार आर. टी. देशमुख हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी होते. वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरली होती.

माजलगाव मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. पाच वर्षे त्यांनी माजलगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व केले. अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी, संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची ओळख परळीसह बीड जिल्ह्यात राहिलेली आहे. माजी आमदार आर. टी. देशमुख हे लातूर -तुळजापूर- सोलापूर मार्गावरील बेलकुंड जवळ असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. गंभीर जखमी देशमुख यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडेंनी सर्व कार्यक्रम रद्द करत गाठले लातूर

दरम्यान, राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले. आर टी देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT