Gun firing crime 
बीड

Gun firing beed: "तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर" म्हणत गोळीबार; ८५ वर्षीय वृद्ध जखमी, एकावर गुन्हा

आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करून धमकी देखील दिली

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : तालुक्यातील खोडवा सावरगाव तांडा येथे घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ८५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका ३१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश फुलसिंग जाधव (वय ५०, व्यवसाय शेती, रा. खोडवा सावरगाव तांडा, ता. परळी) यांच्या तक्रारीवरून परसराम विद्याधर जाधव (वय ३१, रा. खोडवा सावरगाव तांडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली. फिर्यादी, त्यांची पत्नी आणि वडील घरासमोर बसले असताना आरोपीने रागाच्या भरात अनाधिकृत गावठी कट्ट्यातून तीन ते चार गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या गोळीबारात फिर्यादीचे ८५ वर्षीय वडील फुलसिंग हरी जाधव जखमी झाले. तसेच गोळीबारामुळे घराच्या दरवाजाचेही नुकसान झाले. यानंतर आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करून धमकी दिली. फिर्यादीच्या मुलीला स्वाधीन करा आणि आणून न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. या घटनेप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील १०९.३५२.३५१(३).३२४(२)कलमांसह ३.२५ शस्त्र अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि मेंडके यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेने खळबळ; आरोपीला तातडीने पकडले

दरम्यान, गोळीबाराची घटना वाऱ्यासारखी परळी व परिसरात पसरली. या घटनेने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती होताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्याचबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन आरोपीला पकडण्याबाबत तत्पर कारवाई सुरू केली. परळी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन गंगाखेड तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतले. गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.या कामगिरीचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT