Fight over goat grazing; one dead
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : उपळी येथे शेतात शेळ्या का चारल्यास या कारणांवरून गावातील दोघांमध्ये भांडण झाले भांडणांचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. यामध्ये एक गंभीर जखमी झाले असून रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. सदरील या घटनेने बडवणी तालुक्यात खळबळ उडाली असून मारहाणीमुळे मृत्यू झाला की हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट नसून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
वडवणी तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका नदीपात्राच्या जवळील शेतात शेळ्या चारण्यावरून गावातील एका व्यक्तीसोबत शेख इब्राहिम शेख बासु (वय ५७ वर्षे) यांचा वाद झाला. झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत एक गंभीर जखमी झाले असून शेख इब्राहिम शेख बाशु (५०) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवार दि.२८ ऑगस्ट रोजी कुंडलिका नदीपात्राजवळील शेतात घडली आहे. शेख इब्राहिम यांच्या शेळ्या शेतात गेल्याच्या कारणांवरून वाद निर्माण झाला.
त्यातून झालेल्या हाणामारीत शेख इब्राहिम गंभीर जखमी झाले होते. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू मारहाणीमुळे झाला की हृदयविकाराच्या झटक्याने, अद्याप स्पष्टता नसून शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हे वृत्त संकलन करेपर्यंत वडवणी पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल आला नसल्याची माहिती वडवणी पोलिसांनी दिली आहे.
शेख इब्राहिम यांचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की हृदयविकाराच्या झटक्याने, याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू हाणामारीमुळेच झाल्याचा दावा करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र वडवणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.