Beed Crime News : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या पित्याला कारावासाची शिक्षा Pudhari File Photo
बीड

Beed Crime News : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या पित्याला कारावासाची शिक्षा

बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Father sentenced to prison for sexually assaulting minor girl

बीड, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात पित्याला सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निर्णय बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी दिला.

१६ ऑगस्ट २०२४ रोजी अल्पवयीन मुलगी ही आपल्या घरी जेवण करून बसलेली असताना दारू पिऊन आलेल्या तिच्या वडिलांनी तिला मारहाण केली, त्यामुळे ती शेजाऱ्यांकडे झोपायला गेली. काही वेळाने या पित्याने तिला बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला. यानंतर दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार घडला.

तसेच शेजाऱ्यांनी मुलीला रात्री घरी मुक्काम करू दिला म्हणून शिवीगाळ देखील केली. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन शिरूर कासार येथे आरोपी विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरून तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी. आर. कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालय

बीड येथे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकराची सुनावनी तदर्श जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. घोरपडे यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण ०६ साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा व सहा. सरकारी वकील अनिल बी. तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यास दोषी ठरवत ७ वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणात सहा. सरकारी वकील अनिल बी. तिडके यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी मार्गदर्शन केले तसेच पैरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल सुरेश कदम यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT