Beed Political News : 'शिवछत्र' वरील बैठकीला डॉ. योगेश क्षीरसागरांची दांडी

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर
Beed Political News
Beed Political News : 'शिवछत्र' वरील बैठकीला डॉ. योगेश क्षीरसागरांची दांडीFile Photo
Published on
Updated on

Dr. Yogesh Kshirsagar's absence from the meeting on 'Shiv Chhatra'

बीड, पुढारी वृत्तसेवा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी मजबुत दिसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन निवडणुकीत गटबाजीची बाधा झाली आहे. शुक्रवारी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख डॉ. योगेश क्षीरसागर हे उपस्थित नव्हते. यामुळे वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला आहे.

Beed Political News
Kej Matka Raid | केजमध्ये मटका बुक्कीवर धाड; ‘मटका किंग’सह ५ जणांवर गुन्हा

बीड नगरपालिकेत गेल्या पस्तीस वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. योगेश क्षीरसागर यांनाच झुकते माप दिले जात असल्याचे दिसत होते. परंतु आता ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. क्षीरसागर यांना विरोध करणारा एक गट माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय झाल्याचे चित्र बीडमध्ये दिसत आहे.

आजवर झालेल्या सर्व बैठका पक्षाच्या कार्यालयात झाल्या होत्या. परंतु शुक्रवारी मात्र माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला डॉ. योगेश क्षीरसागर व इतर काही पदाधिकारी अनुपस्थित होते.

Beed Political News
Custard Apple News : सीताफळाला ३० ते ४० रुपये किलो दर; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

यावेळी पक्षाच्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती असून डॉ. क्षीरसागर यांच्या अनुपस्थितीमध्ये ही बैठक झाल्याने, गटबाजीची चर्चा जोर धरत आहे. एकीकडे बीडची नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले असताना दुसरीकडे अशा पद्धतीने ऐन लढाईच्या वेळेला अर्धे सैन्य बाजूला ठेवत बैठका होत असल्याने विरोधकांना बळ मिळत आहे. आता या बैठकीनंतरही वरिष्ठ पातळीवरून काही सूत्रे हालतात का आणि बीडमध्ये दुभंगण्याच्या मार्गावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होऊन मैदानात उतरते का, याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.

डॉ. योगेश क्षीरसागरांच्या भूमिकेने बदलणार चित्र

बीड नगरपालिकेवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी गेली अनेक वर्ष एकहाती कारभार सांभाळलेला आहे. त्यांचेच पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या संघटन कौशल्यातून बीड मतदारसंघात जम बसवलेला आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार बजरंग सोनवणे यांना बीड मतदारसंघातून तब्बल ७४ हजार मतांची आघाडी होती. तर विधानसभा निवडणुकीत योगेश क्षीरसागरांचा अवघा पाच हजार मतांनी पराभव झाला होता. तब्बल सत्तर हजार मते त्यांनी विरोधकांची मिळवली होती, हे यावेळी दिसले. आता ऐन निवडणुकीत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी वेगळी भूमिका घेतल्यास याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो.

राष्ट्रवादीतील गटबाजी विरोधकांच्या पथ्यावर

एकीकडे आ. संदिप क्षीरसागर यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी केलेली असताना विरोधकांमध्ये पडत असलेली फूट त्यांना लाभदायक ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मानणारा मोठा मतदारवर्ग बीड शहरात आहे, याबरोबरच आ. संदीप क्षीरसागर व माजी आ. सय्यद सलीम हे स्वतः शहरातील प्रत्येक प्रभागातून उमेदवारी देताना सर्व निकषात बसणारा उमेदवारच ठरवत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीत फूट पडल्यास विरोधकांना मोठा लाभमिळू शकतो.

बीडमध्ये होणार चौरंगी लढत

बीड नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच एमआयएमकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी यासाठी नियोजन केलेले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यास डॉ. योगेश क्षीरसागर हे भाजपासोबत युती करून निवडणूक लढू शकतात. अशा स्थितीत चौरंगी लढत होणार असून ही चौरंगी लढत कोणाच्या पथ्यावर पडते, हे निकालानंतरच कळू शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news